THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, June 19, 2020

TCS

लॉकडाऊनच्या  काळातील सर्व विद्युत देयके  माफ करा 

ऊर्जा मंत्री ना. नितीन राऊत  यांना वंचित बहुजन आघाडी  अकोला  जिल्ह्याचे  निवेदन

TCS
अकोला,19 June 2020
वंचित बहुजन आघाडीचे  सर्व्हेसर्वां  श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने  अकोला शहरातील  प्रामुख्याने  स्लम प्रभागात  हात मजुरी करणाऱ्या मजुरांचे  कोरोना काळातील आणि भविष्यात त्यांना रोजगारउपलब्ध होईपर्यंत सर्व विद्युत बिल तसेच मनपाने  घर आणि इतर कर  माफ  करावे या मागणीचे निवेदन  आज वंचित बहुजन आघाडी व प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्था तार फाईल यांच्या संयुक्त विद्यमाने   वंचित चे जिल्हा उपाध्यक्ष  महेंद्र डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली  अकोला जिल्हाधिकारी   आणि विद्युत विभागाचे  अधीक्षक अभियंता  यांच्या मार्फत  राज्याच्या ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांना निवेदन दिले आहे  आणि जर हे सर्व माफ जर झाले नाहीतर  आंदोलन करण्यात येणार आहे असा इशाराही देण्यात आलाआहे
www.thecurrentscenario.com
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी  राज्यात लॉकडाऊन  करण्यात आले  या लॉकडाऊनमुळे  हातावर पोट असणाऱ्यांचा रोजगार गेला आहे त्यामुळे त्यांचे मजुरीतून मिळणारे उत्पन्न थांबले आहे आणि याचमुळे त्यांना कुटुंबाचा  उदरनिर्वाह चालविताना  मोठीच कसरत  होत आहे  त्यातच लॉकडाऊनच्या काळातील थकीत  विद्युत देयके भरण्यासाठी त्या कुटुंबाकडे   पैसेच  नाहीत त्यामुळे महाराष्ट्र शासनाने जोपर्यंत सर्वसामान्य मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही तोपर्यंत  सर्वसामान्य जनतेचे विद्युत देयके माफ करण्यात यावीत आणि विद्युत देयके वसूल करण्यासाठी वीज वितरणकंपनी कडून  अडवणूक झाली तर वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा यांचे वतीने आंदोलन करण्यात येणार आहे   आणि  या आंदोलन काळात होणाऱ्या  नुकसानीला विद्युत विभाग जबाबदार असणार आहे याची कृपया नोंद घ्यावी या मागणीचे निवेदन आज  जिल्हाधिकारी अकोला आणि  अधीक्षक अभियंता ,महाराष्ट्र राज्य  वीज वितरण कंपनी कार्यालय  ,अकोला  यांचे मार्फत आज देण्यात आले . निवेदन सादर करतांना चंद्रशेखर नकाशे सोनु वासनिक सिद्ध डोंगरे सचिन खोब्रागडे राजू रामटेके मुकेश खोबरागडे मारुती वासनिक. गितेश सोनटक्के.आकाश शेंडे संदेश मेश्राम प्रतीक मेश्राम सागर वानखडे अमोल ओके प्रथमेश मडामे सुरज मेश्राम शिवा वासनिक बिट्टू मंडे राहुल गोराण अंकित मेश्राम. तेजस बाभुळकर, कपिल मेश्राम आर्यन मेश्राम मनीष रामटेके प्रज्वल मेश्राम यश बोरकर दीक्षांत गजरे प्रशिक मेश्राम अंकित मेश्राम रवी गवई अक्षय सहारे सनी डोंगरे कुणाल डोंगरे आशिष मेश्राम संमेक वाकोडे हे कार्यकर्ते उपस्थित होते