THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Tuesday, June 23, 2020

TCS

लवकरच विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वितरण

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,23 June 2020
समग्र शिक्षा अभियान अंतर्गत मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण शहर साधन केंद्र कस्तुरबा गांधी बालीका विद्यालय शिवाजी नगर परभणी येथे खाजगी प्राथमिक उर्दु विभागाच्या  शाळांना  शासनाच्या वतीने पुस्तकांचे वितरण शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या आदेशाने करण्यात आले.
www.thecurrentscenario.com
यावेळी शिक्षण विभागाचे विस्तार ़अधिकारी कापसीकर, शिक्षक बशीर अहेमद,मो. रियाज, सय्यद शकील,शकील हसन, मो.यासीन, सय्यद नासेर, मोहम्मद जावीद,सय्यद शकील आदींच्या ़उपस्थितीत पुस्तके वाटप करण्यात आले.
कोरोना पासून बचाव करण्यासाठी उपाय योजना म्हणून सोशल डिस्टंगसीगचे नियम पाळून २३ जून रोजी सकाळी ११ वा. वितरण कऱण्यात आले. यात मो.एकबाल प्राथमिक शाळा, डॉ. झाकीर हुसेना प्राथमिक शाळा, मोईदुल मुस्लीमीन प्राथमिक शाळा, मॉडल उर्दु   प्राथमिक शाळा,  मासुम            प्राथमिक शाळा, इंदिरा गांधी प्राथमिक शाळा, एमसीपीएस मोमीनपुरा जारविला एकबाल नगर प्राथमिक शाळा, एमसीयूपीस मदीना नगर,एमसीयूपीस एकमिनार दर्गा रोड आदीं शाळांना शिक्षण विभागाच्या वतीने पुस्तके वाटप करण्यात आली.