THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, June 14, 2020

TCS

सोनू तुझा माझावर भरोसा नाय का पी आय शेख कडील तपास काढला,रेशन धान्य घोटाळा प्रकरण.....

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,14 June 2020
शहरातील शनिवार बाजारातील विजय शर्मा यांचा श्रध्दा ट्रेडींग गोदामात सापडलेल्या मोठ्या प्रमाणातील रेशन धान्य गुन्हातील पोलिस निरिक्षक वाय.एन.शेख यांचा कडील तपास काढून जिंतूर उपविभागीय पोलिस अधिकारी यांचा कडे देण्यात आल्याने सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का ? अशीच चर्चा शहरात जोरदार रंगत आहे.
लाँकडाऊन मध्ये सर्वसामान्य जनता उपासी राहू नये यासाठी शासनाने रेशनचे धान्य मोफत वाटप करण्याचे आदेश सर्वच जिल्हा पुरवठा विभागास देण्यात आले याच संधीचा फायदा पुरवठा विभागासह रेशन दुकानदारानी घेतला.रेशन कार्ड लाभार्थ्यांना कपात करून धान्याचे वाटप करीत उर्वरीत धान्य काळ्या बाजारात विकले हे उघडच होते.दि.६ जून रोजी गंगाखेड-परभणी रोड वर रेशनचे धान्य घेऊन जाणारा ट्रक पोलिस प्रशासनाने पकडला आसता चालकाने ट्रक मधील धान्य शनिवार बाजारातील श्रध्दा ट्रेंडीग येथून आणल्याचेस स्पष्ट केल्याने पोलिस सह उपविभागीय,तहसिलदार यांनी गोदामात धाड मारली आसता मोठ्या प्रमाणात रेशनचा गहू तांदूळ आढळून आला.याबाबत धान्य माफीया श्रध्दा ट्रेंडीग चे विजय शर्मा खुलासा करू शकले नाही.तब्बल दोन दिवसा नंतर दि.८ रोजी धान्य माफीया विजय शर्मा विरूद्ध गुन्हा दाखल झाला.याचा तपास पोलिस निरिक्षक वाय.एन.शेख यांनी स्वताकडे घेतला.सदरील ट्रक मधील २१ टन व शर्मा यांचा गोदामातील मोठ्या प्रमाणातील रेशन धान्य तपासासाठी पोलिस निरिक्षक शेख यांनी तहसिलदार यांची परवानगी न घेताच शासकीय गोदामात जाऊन गोंधळ घालीत रेशन धान्याचे नमुने घेण्याचा प्रकार केला.गुन्हा दाखल होताच धान्य माफीया विजय शर्मा याचा मुसक्या आवळ्यात पोलिस निरिक्षक शेख यांना अपयश का आले याची दबक्या आवाजात सर्वञ चर्चा होत आहे आज पर्यत शर्मा फरारच आहे.सदरील प्रकरणात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना संशय आल्यानेच पोलिस निरिक्षक वाय.एन.शेख यांचा कडील तपास तडका फडकी काढण्यात येवून जिंतूर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी श्रवण दत्थ यांचा कडे देण्यात आल्याने गंगाखेड शहरात सोनू तुझा माझावर भरोसा नाय का ? अशी चर्चा जोरदार होताना दिसत आहे.
www.thecurrentscenario.com