THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Thursday, June 11, 2020

TCS

परभणीत मुसळधार पाऊस..........

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,11 June 2020
परभणीः परभणी शहरासह परिसरात मध्यराञीपासून 
पहाटेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला.या पावसाने संपूर्ण शहर अक्षरशः जलमय झाले, सखल भागात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी घुसले.
www.thecurrentscenario.com
सखल भागातील झोपडपट्टी भागात घराघरातून पाणी घुसले.साखला प्लाॅट,परसावतनगर,वांगीरोड,धाररोड, जामरोड वगैरे भागात पावसाचे पाणी शिरल्याने मोठी  दाणादाण उडाली. नागरिकांनी धास्तीपोटी पावसात लेकरंबाळासह मध्यराञीपासून सकाळ पर्यंत जागरणच केले.
रस्ते जलमय झाले होते.मध्यवस्तीत पाणीचपाणी साचले होते.अन्य काॅलन्यात रस्ते ,मोकळी मैदाने,घरांसमोर पाणीचपाणी होते..काही ठिकाणी तळ्यांचेच स्वरूप आले.नाथनगर,ञिमुतीनगर,दत्तनगर,सरफारजनगर,सागरनग,योगक्षेम काॅलनी,मिसरनगर वगैरे भागात घराघरांतून गुंड्या ऐवढे पाणी साचले होते.
त्यात काही भागातील वीजपुरवठा खंडित झाला.काही ठिकाणी जादा दाबाने, काही भागात कमी दाबाने विज पुरवठा सुरु होता. त्यामुळे विजेवरील उपकरणे जळाली.
दरम्यान गेल्या बारा तासात परभणी परिसरात ४८.३८मि.मी पावसांची नोंद झाली.
जिल्ह्यातील मानवत तालूक्यात सर्वाधिक पावूस झाला.नदी,नाल्या, शेत पाण्याने ओसंडून वाहत होते.एकूण त्या तालुक्यात ६१.३३मि.मी पावुस झाला.पाथरीसही जोरदार पावूस होता.