THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Monday, June 8, 2020

TCS

रेशनधान्य माफिया विजय शर्मा यांचावर अखेर गुन्हा दाखल

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,09 June 2020
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी रेशनधान्य माफिया विजय शर्मा यांचा गोदामात उप विभागीय अधिकारी सुधीर पाटील तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी दि.६ जून रोजी सांयकाळी मारलेल्या धाडीत मोठ्या प्रमाणात रेशनधान्य खरेदी केल्या प्रकरणी अखेर आज विजय शर्मा,ट्रक चालक मुरलीधर बेले यांचावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील धान्य कोण कोणत्या रेशन दुकानदाराने विकले आहे यांचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिस प्रशासना समोर आहे.

शनिवार बाजार मध्ये आसलेल्या पणन महासंघाचा नाममाञ भाडे तत्वावर दिलेल्या शर्मा ट्रेडिंग  कंपनी गोदामात धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली तर काल दि.६ जून रोजी गहुने भरलेला ट्रक गंगाखेड शहराच्या बाहेर जात असताना पोलिस प्रशासनाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता ट्रकची चौकशी केली असता शहरातील विजय शर्मा यांचा श्रध्दा ट्रेडिंग कंपनीतून गहू घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितल्या नंतर गंगाखेडची उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक शेख यांनी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान या ठिकाणी छापा मारून येथे असलेल्या धान्याची व बारदाने याची उशिरा पर्यंत चौकशी सुरू करण्यात आली यात सदरील गहू आणी तांदूळ शेतकऱ्याने विकल्याचे शर्मा सातत्याने सांगत होता पण तालुक्यात शेतकरी कुठेच भात शेती करत नाही हे उघडच आहे.गोदामात गहू व तांदुळ यांची पोठी थप्पी दिसुन येत होती तर शासकीय शिक्के आसलेला बारदाना आढळून आला या दरम्यान खरेदी-विक्रीच्या संशयावरून प्रशासनाने झाडाझडती राञी उशीरा पर्यत सुरू होती तर धान्य खरेदी-विक्रीच्या पावत्यांची चौकशी सुरू होती. सदरील गहुने भरलेला ट्रक पोलिसानी जप्त होता.या प्रकरणाची व्याप्ती मोठी आसून आरोपी विजय शर्मा ट्रक चालक मुरलीधर बेले यांचावर गुरन २८०/२०२० कलम ४६८ ४७१ ३,७,१९४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.....

www.thecurrentscenario.com