THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Wednesday, June 3, 2020

TCS

पातूर शहरात गाव गुंड्यांचा हैदोस

---- वयोवृद्ध वाहन चालकाला गाडी अडवुन केली मारहान

फ़रहान अमीन
पातूर,03 June 2020
पातूर येथील कृषि उत्पन्न बाजार समिति जवळ भरदिवसा वयोवृद्ध वाहन चालक सुभाष पोहरे यांना गाडी अडवुन अश्लील शिविगाळ करुन लाथा -बुक्क्यांनी मारहान केल्याची घटना आज दि. ०३/०६/२०२० सायंकाळी चार वाजताच्या सुमारास घडली. याबाबत पातूर पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पातूर येथील टि. के. व्ही. चौकाजवळील कृषि उत्पन्न बाजार समिति जवळ आरोपी शुभम अरखराव रा. आगिखेड याने फिर्यादी यांच्या अॅपेजवळ येवुन कोणतेही कारण नसतांना फिर्यादी सुभाष पोहरे यांच्या सोबत हुज्जत घातली. व अश्लील शिविगाळ करुन जबर मारहान केली. व तेथुन पसार झाला. कोणतेही कारण नसतांना सुभाष पोहरे यांना मारहान केल्यामुळे त्याला कुणी सांगितले तर नसावे? अशी चर्चा पातूर शहरात होत आहे. याबाबत वाहन चालक सुभाष पोहरे केलेल्या फिर्यादीवरुन पातूर पोलीसात कलम ३२३,५०४,५०६ नुसार आरोपी शुभम अरखराव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पातूर पोलीस करित आहे.