THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, June 7, 2020

TCS

शर्मा ट्रेडिंगचा गोदामावर धाड प्रशासनाची चौकशी सुरू धान्याचा एक ट्रक जप्त,बडे मासे गळाला लागणार ?

परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे✍️
शहरातील प्रतिष्ठित व्यापारी विजय शर्मा यांच्या शर्मा ट्रेंडिंग गोदामावर उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ यांनी पोलिस प्रशासनाच्या  उपस्थित धाड टाकली आसता रेशनचे गहू तांदूळ मोठ्या प्रमाणात आढळून आले तर धान्याने भरलेला गोदामा समोर ट्रक जप्त करण्यात आल्याने रेशनधान्याचा काळा बाजार करणाऱ्या रेशन दुकानदारात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोरोना कोव्हिड विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणुन शासनाने संपूर्ण देश लाँकडाऊन करण्यात आला पण सर्वसामान्यासह मजूर गरीब वर्ग उपासी राहू नये यासाठी केंद्र व राज्य शासनाने मार्च ते मे या तीन महिण्याचे रेशनधान्य वेळेचा पूर्व वाटप करण्यात आले यात मोफत तांदूळ वाटप करण्यात आला तर केशरी कार्ड धारकाना वाढीव किमतीत धान्याचे वितरण केले.याचा पूर्णपणे फायदा पुरवठा विभागासह रेशन दुकानदारानी घेतलेला आहे.शहरातील अनेक दुकानदारानी
मोफत तांदूळ वाटपात मोठ्या प्रमाणात कपात करून वाटप केल्याचा उघड प्रकार झालेला आसताना पुरवठा विभाग मुग गिळून गप्प होता.तर केशरी कार्ड धारकाना आलेल्या वाढीव किंमतीचे धान्य कार्ड लाभार्थ्याने घेतलेच नसल्याने धान्याचा काळाबाजार होत आसल्याचे उघडच आहे.शहरातील शनिवार बाजार मध्ये आसलेल्या पणन महासंघाचा नाममाञ भाडे तत्वावर दिलेल्या शर्मा ट्रेडिंग  कंपनी गोदामात धान्याचा काळाबाजार सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली तर काल दि.6 जून रोजी गहुने भरलेला ट्रक गंगाखेड शहराच्या बाहेर जात असताना पोलिस प्रशासनाच्या वतीने सायंकाळी पाच वाजता ट्रकची चौकशी केली असता शहरातील शर्मा ट्रेडिंग कंपनीतून गहू घेऊन जात असल्याचे चालकाने सांगितल्या नंतर गंगाखेडची उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार स्वरूप कंकाळ, पोलीस निरीक्षक शेख यांनी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान या ठिकाणी छापा मारून येथे असलेल्या धान्याची व बारदाने याची उशिरा पर्यंत चौकशी सुरू करण्यात आली यात सदरील गहू आणी तांदूळ शेतकऱ्याने विकल्याचे शर्मा सातत्याने सांगत होता पण तालुक्यात शेतकरी कुठेच भात शेती करत नाही हे उघडच आहे.गोदामात गहू व तांदुळ यांची पोठी थप्पी दिसुन येत होती तर या दरम्यान खरेदी-विक्रीच्या संशयावरून प्रशासनाने झाडाझडती राञी उशीरा पर्यत सुरू होती तर धान्य खरेदी-विक्रीच्या पावत्यांची चौकशी सुरू होती. सदरील गहुने भरलेला ट्रक पोलिसानी जप्त केला आहे.या प्रकरणाची व्याप्ती मोठी आसल्याचा संशय प्रशासनास आल्याने चौकशी अद्यापही सुरूच आहे.