THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Saturday, June 6, 2020

TCS

पुणेकर आले आणि गावात भांडण सुरू झाले

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,06 June 2020
कोरोणा १९  विषाणूमुळे माणूस माणसात राहिले नाहीत जवळील व्यक्तींना माणूस संशयाच्या नजरेने पाहत आहे. त्यातल्या त्यात पुणे आणि मुंबई या ठिकाणाहून कोणी व्यक्ती जर आला तर त्याची विचारणा होणारच! आता याला कारणही तसेच आहे. पुणे आणि मुंबई हे कोरोना  विषाणू हॉट स्पॉट आहेत .या ठिकाणाहून येणारे व्यक्तीवर संशय तर असणारच.गंगाखेड तालुक्यात असाच काहीसा प्रकार घडला आहे.मुंबई मानखुर्द वरून आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेमुळे गंगाखेड तालुक्याची कोरोना  बाधितांची  संख्या वाढली होती. अशा रेड झोनवरून  गावात येणाऱ्या व्यक्तीची विचारना तर होणारच,
 गावात एक जरी अनोळखी व्यक्ती आला तर गावात तेव्हाच कळते. असाच काहीसा प्रकार गंगाखेड तालुक्यातील अकोली या गावात घडला आहे. पुण्याहून आलेला अभिमान होनमणे याची संगीता गेजगे यांच्या पतीने विचारणा केली असता ग्रामपंचायत सेवक मल्हारी गेजगे यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी फीर्यादीस व मुलास हाता बुक्याने मारहाण करीत, शीवीगाळ करत,जीवे मारण्याची धम्मकी दिली आहे.हा प्रकार घडल दि ५ जून रोजी सकाळी घडला आहे.संगीता संभाजी गेजगे यांच्या फिर्यादीवरून मल्हारी भुजंग गेजगे, विकास पिटनर,रवि पिटणार, गणेश मारोती गेजगे, यांच्या विरोधात गंगाखेड पोलीस ठाण्यात कलम ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ भा. द. वि. अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद मुंडे हे करत आहे.
www.thecurrentscenario.com