THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Wednesday, June 10, 2020

TCS

पाथरीत महिला कोरोना योध्दाचा राष्ट्रवादीच्या वतीने सन्मान.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वर्धापण दिनानिमित्त घेतला कार्यक्रम.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,10 June 2020
कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य जनतेचे आरोग्य सुरक्षीतेसाठी अहोरात्र परीश्रम घेणाऱ्या महिला कोरोना योध्दा यांचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या
वर्धापनदिनाच्या औचित्याने परभणी जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने १० जुन रोजी सकाळी १०:१० वा.करण्यात आला.
www.thecurrentscenario.com
           
हा कार्यक्रम कोरोनातील महिला योध्दा यांच्या सन्मानार्थ मर्दानी महाराष्ट्राची या अभियानातंर्गत परभणी जिल्ह्यातील महिला कोरोना योध्दांच्या सत्काराचे आयोजन शांताबाई नखाते विद्यालय पाथरी येथे १० जुन रोजी  करण्यात आले.
 कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार बाबाजाणी दुर्राणी तर प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अनिलराव नखाते,संयोजीका तथा परभणी महिला रा.काँ च्या जिल्हाध्यक्षा भावनाताई नखाते पाथरी महिला तालूकाध्यक्षा सुनंदाताई फलके,पं.स.माजी सभापती शिवकन्याताई ढगे.
 कोरोना महामारीच्या संकटात सर्वसामान्य जनतेची सेवा करणा-या विविध विभागात काम करणाऱ्या पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅ.अंकिता अशोकराव मुक्तावार,ग्रामीण रूग्णालय पाथरी येथील सौ.शोभा मारोतराव गुडमे,पोलिस स्टेशन पाथरी येथील कु.राजश्री बहिरे,
अंगणवाडी सेविका सौ.आशामती  माने,आशा वर्कर सौ.मंगल सांगुळे यांचा कोरोना योध्दा म्हणून मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ,भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेस ला कोरोना योध्दा चा अभिमान आहे परभणी जिल्ह्यात कोरोना महामारीशी तोंड देताना आपल्या कुटुंबासह स्वतः च्या जिवाची पर्वा नकरता अत्यंत आत्मीयतेने कर्तव्य बजावणारे कोरोना योध्दा चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेतृत्वापासुन पदाधीकारी व कार्यकर्त्यांना अभिमान वाटत आहे,कोरोनाशी लढा देणारे योध्दा यांचे समाज ऋण कधीच विसरणार नाही असे आमदार बाबाजाणी दुर्राणी यांनी बोलतांना सांगितले.प्रतेकाने फिजिकल डिस्टन्सिंग चा नियम तंतोतंत पालन करुन मास्क व सँनिटयझर चा वापर नियमित करून आपले व कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे असे आवाहन ही आ.दुर्राणी यांनी केले.
■  महिलांचे मोठे योगदान प्रशंसनीय.  कोरोना महामारीच्या संकटामध्ये आपल्या महिलांनी अत्यंत समर्थपणे तोंड देत असुन घरातील सदस्यांची काळजी घेत असुन सामाजिक सुरक्षिततेचे भान महिलांनी चांगल्या पद्धतीने ठेवले आहे.पुढेही सर्व महिलांनी कोरोना महामारीचा धिराने सामना करावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.महाविकास आघाडी सरकारच्या नियोजनबध्द कारभारामुळे आपण कोरोनाशी यशस्वीपणे लढा देऊ शकत आहोत असे महिला रा.काँ.च्या जिल्हाध्यक्षा सौ.भावनाताई नखाते यांनी यावेळी बोलतांना सांगितले.