THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, May 22, 2020

TSC

पाणी भरण्याच्या वादावरून गंगाखेडात युवतीवर चाकूहल्ला !

परभणी ब्यूरोचीफ राजकुमार मुंडे✍️ 
२१ मई २०२०
शहरातील देवळे जिनिंग परिसरात पाणी भरण्याच्या वादावरून 13 वर्षीय युवतीवर हल्ला झाल्याची हल्ला झाल्याची घटना 22 मे शुक्रवार रोजी शहरात घडली.गंगाखेड शहर हे गोदावरी नदी काठावर वसलेले शहर असून शहरात पाणीपुरवठा करणाऱ्या मासोळी धरणांमध्ये मुबलक पाणी साठा उपलब्ध असताना सुद्धा शहरास महिन्यातून केवळ तीन ते चार वेळेस पाणी पुरवठा केल्या जातो. शहरातील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा
 सामना करावा लागत आहे यातूनच गंगाखेड शहरातील देवळे जिनींग मध्ये राहणाऱ्या वैष्णवी सूर्यकांत भिसे वय 21वर्ष या महिलेचे शेजारीच असणार्‍या शेख हजरा बेगम या महिले सोबत शाब्दिक चकमक सुरू झाली असता आरोपी चा मुलगा  शेख अफसर ,मुलगी शेख निलोफर शेख आयुब रा. देवळे जिनिंग  यांनी फिर्यादी ची बहिण वेदांत भिसे वय 13 वर्ष ही भांडणे  सोडवण्यासाठी आली असता आरोपींनी  तिच्या उजव्या हाताच्या दंडावर  चाकू मारल्याची घटना घडली. सदर आरोपी विरोधात गंगाखेड पोलीस स्टेशन येथे वैष्णवी भिसे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.