THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Tuesday, May 19, 2020

TCS

बँकांनी शेतकऱ्यास फेरफार नक्कलेची मागणी करु नये.

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,19 May 2020
शेतकऱ्यांना पीक कर्ज बँकानी तातडीने उपलब्ध करून द्यावेत त्यासाठी फेरफार नक्कलेची मागणी केल्याने शेतकरी तहसिल कार्यालयात गर्दी करीत आहेत यामुळे जमावबंदी सोशल डिस्टन्शिंग नियमाचे उल्लघंन होत आसल्याने शेतकऱ्यांचा फेरफार साठी बँकानी आँनलाईन फेरफार अँपचा माध्यमातून उपलब्ध करून घ्यावेत शेतकऱ्यांना फेरफारची मागणी करू नये असे आदेश तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी बँकाना दिले.
www.thecurrentscenario.com
सततचा दुष्काळ,गारपीट व अवेळी पडलेल्या पावसाने शेतकऱ्याचे कंबरडे मोडले असुन शेतकरी संकटात सापडला आहे.यातच गेल्या दोन महिन्यापासुन कोरोना या महाभयंकर रोगाचा पादुर्भाव आल्याने नागरीकात भितीचे वातावरण परसले असून कोरोनामुळे देश गेल्या दोन महिन्यापासुन लाँकडाऊन असल्यामुळे नागरीकाच्या तसेच शेतकऱ्याच्या हातावरचे मोलमजुरीचे बंद पडली आहेत.लाँकडाऊनचा चौथा टप्पा ओलांडला असुन बँकांनी पिक कर्जासाठी जाचक अटी नियम केले असुन शेतकरी संकटात सापडला असल्यामुळे बँकांनी शेतकऱ्याकडुन फेरफार नकलीची मागणी केली असल्यामुळे शेतकरी ञस्त आहेत.बँकांनी शेतकऱ्याकडुन फेरफार नक्कलीची मागणी करुन आडवणूक करीत होते.यावर बँकांनी शेतकऱ्या कडुन पिककर्ज नुतणी करणासाठी खातेदार यांच्याकडुन फेरफार नक्कलेची मागणी चुकीची आसल्याचे सांगत पिक कर्जासाठी खातेदार हे जुनेच आहेत,त्यांची माहिती अगोदरच आहेच तसेच ई-महा संकेतस्थळावर फेरफार उपलब्द आहेत याबाबत बँकानी खात्री करुनच जुन्या खातेदारा कडून फेरफार नकलेची मागणी करु नयेत,व सोशल डिस्टींग पालन ही होईल.अन्यथा कार्यवाही करण्यात येईल.असा इशारा तहसिलदार स्वरूप कंकाळ यांनी बँक व्यवस्थापकास दिला आहे.