THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Monday, May 11, 2020

TCS

लाँकडाऊनमुळे अडकलेले मध्यप्रदेशातील ४८ मजुर  बसने रवाना 

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,11 May 2020
तब्बल दिड महिनापासून लाँकडाऊनमध्ये अडकलेल्या मध्यप्रदेशातील ४८ मजुर आपल्यागावी जाण्यासाठी तळमळ करीत होते,परंतु लालकडाऊन असल्यामुळे त्यांना आहे त्याच ठिकाणी रहाण्याची वेळ आली होती परंतु जालनाच्या रेल्वे दुर्घटने नंतर सरकारला जाग आल्याने अखेर नागरीकांना आपल्या मुळ गावी जाण्यासाठी परिवहन मंडळाच्या मोफत बसने जाण्याची व्यवस्था केल्याने गंगाखेड ,सोनपेठ तालुक्यातील ४८ मजुरांना मध्य प्रदेशातील मुळगावी जाण्यासाठी आज दि.११ रोजी गंगाखेड बस आगारातुन तीन बस मधून रवाना करण्यात आले.
 गंगाखेड व सोनपेठ तालुक्यात कापूस जिंनिग मध्ये रोजदारीवर आसलेले कामगार लाँकडाऊनमुळे अडकले होते,त्याना मुळगावी मध्य प्रदेशकडे जाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने ते येथेच अडकले होते,कंटाळुन हे मजुर पायी चालत निघाले होते परंतु पोलीस प्रशासनाने त्यांना पकडुन जेथे कामे केली तेथे रहाण्यास तंबी दिल्याने ते परत कामावर गेले परंतु लाँकडाऊन शीथील होत नसल्याने जाण्यासाठी मुक्कदम कडे तगादा लावत होते.
मध्येच करमाड येथील मोठी दुर्घटना घडल्याने प्रशासन खरबडुन जागे झाले व जे मजुर जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी अडकले त्यांच्यासाठी परिवहन महाम़डळाच्या मोफत बस गाड्या सोडण्याची हमी घेतल्याने गंगाखेड येथील अभिजीत,व्यंकटेश जिनींग चे मजुर ३९ व सोनपेठ
तालुक्यातील उसतोड मजुर ८ पालम सोनपेठ येथील जिनिंग व गंगाखेड येथील अभिजीत जिंनीग मधील असे एकुन ४८ मजुरांना आज दि.११ रोजी सकाळी ९ वा. गंगाखेड येथील वैद्यकिय अधिकारी डाँ.योगेश मल्लुरवार यांनी सर्वच  मजुरांच्या तपासण्या करुन बसमध्ये रवाना करण्यात आले.
या मजुरासाठी तहसिल प्रशासनाने पाणी  नाष्टा दिला.यावेळी तहसिलदार स्वरुप कंकाळ,उपविगभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीरे, सुधिर पाटील,आगार प्रमुख कराळे, स्थानक प्रमुख धर्माधिकारी,, शेख शफी,अदिसह परिवहन महामंडळाचे कर्मचारी सैनीक ,डाँक्टर,वैद्यकिय अधिकारी,तलाठी चंद्रकांत साळवे,मुरकुटे अदिसह कर्मचारी उपस्थित होते.