THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, May 10, 2020

TCS

किराणा प्रतिष्ठाना वर प्रशासनची दंडात्मक कारवाई अन्यायपुर्वक-कुद्दुस शेख

फ़रहान अमीन
पातुर,10 May 2020
सोशल डीस्टेंसींग चे ग्राहकांनी पालन न केल्यामुळे काल मूर्तिजापुर व अकोला येथे तेथील स्थानिक प्रशासनाने किराणा प्रतिष्ठानावर दंडात्मक कारवाई केली आहे हि कारवाई किराणा व्यावसायिकावर अन्याय करणारी आहे असे प्रतिपादन  पातूर किराणा असोसिएशनचे उपाध्यक्ष कुद्दूस शेख यांनी केले आहे आज संपूर्ण जगात कोरोना वायरस ने हाहाकार माजवला  आहे आपला देश ही कोरोना शी लढा देत आहे त्या करीता सोशल डीस्टेंसींग हा महत्वपूर्ण उपाय आहे किराणा वस्तू हि जीवनावश्यक असल्यामुळे किराणा दुकानदार जिवाची पर्वा न करता दुकाना समोर सोशल डीस्टेंसींग चे रकाणे आखून ग्राहकांना सेवा देत आहे परंतु वेळ कमी असल्याने ग्राहकांची गर्दी होते व सोशल डीस्टेंसींग चे पालन होत नाही
www.thecurrentscenario.com
अशा वेळी ग्राहकांना कितीही सांगितले तरी ऐकत नाही व सोशल डीस्टेंसींग चा फज्जा उडतो या कारणा वरुन पातुरातील काही किराणा प्रतिष्ठान एक दिवस बंद करून तहसीलदार दिपक बाजड यांना निवेदन करुन काही दुकानाकरिता पोलीस संरक्षण ची मागणी केली होती व्यावसायिकांनी आपल्या दुकाना समोर सोशल डीस्टेंसींग ची व्यवस्था केली आहे जर नागरिकच सोशल डीस्टेंसींग चे नियम मोडत असेल तर व्यापारांना दोषी धरु नये अशी मागणी व्यावसायिका कडुन होत आहे