THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, May 8, 2020

TCS

परभणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून गंगाखेड जुगार अड्ड्यावर धाड बारा जण अटकेत

राजकुमार मुंडे
गंगाखेड महाराष्ट्र,08 May 2020
परभणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला गंगाखेड शहरां लगत यज्ञभूमी परिसराच्या पाठीमागे पत्त्याचा जन्ना मन्ना नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून दिनांक सात मे रोजी सायंकाळी 04:40 या पथकाने छापा टाकून बारा आरोपीला ताब्यात घेतले व त्यांच्याकडून पत्त्याचे साहित्य व व नगदी रोकड सहित मुद्देमाल 61 900 रुपये जप्त केला आहे आरोपीविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी की गंगाखेड शहरातील यज्ञभूमी च्या पाठीमागे रेल्वे पटरी लगत मोकळ्या जागेत जन्ना मन्ना नावाचा जुगार चालत असल्याची माहिती परभणी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती दारा द्वारे मिळाली होती दिनांक 7 मे रोजी सायंकाळी चार वाजून 40 मिनिटाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक प्रमुख फिर्यादी शरद अर्जुन वि पट यांच्या पथकाने येथे येऊन छापा मारला व बारा जणांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळून 61900रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यामध्ये फिर्यादी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे सपोनि शरद अर्जुन विपट यांच्या फिर्यादीवरून आरोपी सय्यद अब्दुल ,शेख वजीर, सैय्यद कलीम, बालाजी घोगरे ,रावण सावंत ,शेख विलियाज,सय्यद रियाज ,आश्रम खा, परमेश्वर कदम, कृष्णा पुरी, आकाश मोरे, साई इ पूर्ण नाव माहिती नाही सर्व राहणार गंगाखेड यांच्याविरुद्ध जुगार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास गंगाखेड पोलिस हे करीत आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक प्रमुख शरद अर्जुनी विपट पोलीस कॉन्स्टेबल चट्टे जक्केवाढ तुपसुंदर, केंद्रे, भुजबळ ,भुसारे ,वाघमारे, कांबळे यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली