लाँकडाउन मध्ये भांडी विक्री करणाऱ्या येरावार यास पोलिसाचे अभयच,कार्यवाहीतून सुट.....
राजकुमार मुंडे
गंगाखेड महाराष्ट्र,13 May 2020
शहरातील भगवती चौक रस्तावरील व्यंकटेश भांडी सेंटरचे व्यापारी कृष्णा येरावार यांनी लाँकडाउन संचारबंदी जमावबंदी आदेश पायदळी तुडवित भांडी विक्रीचा व्यापार दुकाना ऐवजी गोदामातुन सुरू ठेवल्या प्रकरणी आज दि.१३ रोजी गंगाखेड शुगर संचालक बापुसाहेब सातपुते यांनी पोलिस प्रशासनास माहिती देत घटनास्थळी उघड प्रकार दाखवून सुद्धा पोलिस प्रशासनाने कसलीच कार्यवाही न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आसल्याने सर्वञ संचारबंदी जमावबंदी सह लाँकडाउन करण्यात आल्याने केवळ जिवनावश्यक वस्तुचा दुकानास केवळ चार तासाची सवलत देण्यात आलेली आसताना शहरातील भगवती चौकातील व्यंकटेश भांडी सेंटर कृष्णा येरावर लाँकडाउन काळात भांडी विक्रीचा व्यापार उघडपणे करीत होते.सदरील दुकाचा एक दरवाजा उघडा ठेवत नागरिकांना दुकानात घेत बाहेरून दुकान बंद तर आतुन भांडी विक्री मोठ्या प्रमाणात सुरूच होती.याबाबत अनेकांनी तक्रार करून सुद्धा पोलिस प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.आज दि.१३ रोजी इसाद परीसरातील काही नागरिकांना लग्नाचा भांडी खरेदीसाठी व्यंकटेश भांडी सेंटर मध्ये गंगाखेड शुगर संचालक बापुसाहेब सातपुते यांनी पाठविले आसता सदरील नागरिकांना दुकाना ऐवजी कृष्णा येरावार यांनी गोदामात नेले.ही बाब बापुसाहेब सातपुते यांनी गस्तीवर आसलेल्या पोलिसास सांगतली आसता त्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने याबाबत उपविभागीय पोलिस अधिकारी यांना कळवताच घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरिक्षक कोकाटे यांनी धाव घेतली आसता भांडी विक्रीचा प्रकार उघडपणे दिसून आला.या प्रकरणी व्यापारी कृष्णा येरावार यास ताब्यात घेत पोलिस निरिक्षक वाय.एन.शेख समोर हजर करण्यात आले.पण उशीरा पर्यत व्यापारी कृष्णा येरावार याचावर गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता या प्रकरणी गंगाखेड शुगर संचालक बापुसाहेब सातपुते यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक यांना झालेला प्रकार सांगण्यात येउन लाँकडाउन जमावबंदी संचारबंदी कायदा धाब्यावर बसवून खुलेआम भांडी विकणा-या कृष्णा येरावार यांना रंगेहात पकडवुन सुद्धा पोलिस प्रशासनाने मोठा अर्थीक व्यवहार करीत गुन्हा दाखल न केल्याचे उघड पणे सांगण्यात आले.याप्रकरणी जिल्हा पोलिस अधिक्षक काय कार्यवाही करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.