THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Wednesday, May 6, 2020

TCS

रमजान ईद होईपर्यंत परभणी जिल्ह्यातील बाजारपेठ उघडण्याची परवानगी देऊ नये-पत्रकार अनीस भाई खुरेशी

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,07 May 2020
 जगभरात कोरोनाव्हायरस ने धुमाकूळ घातला असून हजारो नागरिकांना या रोगाची लागण होत आहे. अशा वातावरणात रमजान ईदच्या खरेदीसाठी कापड दुकाने,बुटाचे दुकाने तसेच सौंदर्यप्रसाधनांची दुकाने उघडण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी पालम येथील पत्रकार अनीस अब्दुल लतीफ   खुरेशी यांनी जिल्हाधिकारी  परभणी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे त्यात त्यांनी म्हटले की संपूर्ण जगभरात COVID-19 (कोरोना)या जागतीक महामारीने थैमान घातले असून महाराष्ट्र राज्यात कोरोना बांधीत रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक झाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या संकटातून राज्याच्या जनतेला वाचविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे
.व सुदैवाने आपला परभणी जिल्हा ग्रीन झोन मध्ये आहे.नुकताच पवीत्र रमज़ान महिना सुरू झाला असून पुढील काही दिवसात रमजान ईद हि आम्ही घरात राहुनच साजरी करणार आहोत.रमजान ईद निमित्ताने जर परभणी जिल्हयातील कापड दुकान,बुट हाउस,सौंदर्यप्रसाधनांची दुकाने व इतर बाजारपेठेतील दुकानावर मुस्लिम समाजाची गर्दी होउ शकते त्यामुळे Social Distancing राहणार नाही.व गर्दीत जर एखाद्या कोरोना बांधीत रूग्ण असल्यास परभणी जिल्हायात कोरोनाचा विस्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रम़जान ईद पुढीच्या वर्षी पुन्हा येणार परंतु जिवन पुन्हा येणार नाही म्हणून परभणी जिल्ह्य़ातील जनतेच्या व देशाच्या हितासाठी रमजान ईद होई पर्यंत बाजारपेठे बंदठेवण्यात यावे अशी मागणी केली आहे.