THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Wednesday, May 6, 2020

Tcs

‘त्या’ स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द !

गोविंद यादव यांचा पाठपुरावा; ग्रामस्थांना मिळणार धान्य 

राजकुमार मुंडे 
गंगाखेड़ महाराष्ट्र,06 May 2020
तालुक्यातील कासारवाडी येथील स्वस्त धान्य दुरानादाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे. धान्य वितरणात गैरप्रकार केल्याच्या तक्रारी आल्यानंतर सदर दुकानदारावर कारवाईसाठी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी पाठपुरावा केला होता. या कारवाईनंतर स्वस्त धान्य नियमानुसार मिळण्याचा मार्ग खुला झाल्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
www.thecurrentscenario.com
गंगाखेड तालुक्यातील कासारवाडी येथील स्वस्त धान्य दुकानदार ग्रामस्थांना नियमित धान्य वितरीत करत नसल्याच्या तक्रारी होत्या. एप्रिल महिण्याचे धान्य वितरीत न करण्याबरोबरच मोफत तांदुळही वाटप न केल्याचा लेखी तक्रार ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. तक्रारी नंतर गंगाखेड तहसीलदारांच्या वतीने दुकानदाराच्या कारभाराचा पंचनामा करण्यात येवून अहवाल जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता.
या संदर्भात कासारवाडी येथील ग्रामस्थांनी कॉंग्रेस तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांची भेट घेवून स्वस्त धान्य ऊपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. यादव यांनी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष, आमदार सुरेश वरपुडकर यांची भेट घेवून सदर दुकानदारावर कारवाई व कासारवाडी ग्रामस्थांना दुसऱ्या स्वस्त धान्य दुकानास जोडण्याची मागणी केली होती. श्री वरपुडकर यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांना सुचना देत कारवाईचे निर्देश दिले होते. यानंतर जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी कारवाई करत सदरील स्वस्त धान्य दुकानदाराचा परवाना रद्द केला असून येथील शिधापत्रिका धारकांना टोकवाडी येथील दुकानास जोडण्यात येत असल्याचे कळवले आहे. यामुळे कासारवाडी ग्रामस्थांना नियमित व योग्य प्रमाणात स्वस्त धान्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून ग्रामस्थांनी आ. सुरेश वरपुडकर व गोविंद यादव यांचे आभार मानले आहेत.
सर्वांना धान्य मिळवून देणे हाच ऊद्देश - गोविंद यादव
कोणत्याही दुकानदाराचा परवाना रद्द करणे हा आपला ऊद्देश कधीच नव्हता, नाही. परंतू कोरोना साथीच्या पार्शभूमीवर सर्वांना धान्य मिळणे अत्यंत आवश्यक आहे.  पात्र लाभार्थ्यांना योग्य प्रामाणात व योग्य किमतीत स्वस्त धान्य मिळाले
पाहिजे यासाठीच प्रयत्न सुरू असल्याची प्रतिक्रिया कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली आहे. तालुक्यातील सर्वच स्वस्त धान्य दुकान चालकांनी लाभार्थ्यांची अडवणूक व लुबाडणूक थांबवावी, अन्यथा अशाच प्रकारच्या कारवाईस सामोरे जावे लागेल, असा ईशाराच यादव यांनी दिला आहे.