THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Thursday, May 7, 2020

TCS

गोदावरीतील बेकायदा वाळू उपसामुळे रेल्वे पुलाचा पाया झाला उघडा,रेल्वे महसुल प्रशासन झोपेतच....
राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,07 May 2020
कोरोना लाँकडाउन संचारबंदीचा बंदोबस्तात पोलिस महसुल गुंतल्याचा फायदा वाळू माफीयाने पुरेपुर घेत रेल्वे पुलाजवळ मोठ्या प्रमाणात वाळू सुरू केल्याने रेल्वे पुलाचा पाया चार फुटा पर्यत उघडा पडला आसताना याकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.बेकायदा वाळू उपसास महसुल पोलिस प्रशासनाचा पाठीबा आसल्याचे उघड होताना दिसत आहे.
www.thecurrentscenario.com
कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने लाँकडाउन संचारबंदी जमाबंदी करून नागरिकांना घरातुन बाहेर पडण्यास मज्जाव केला आहे.रस्त्यावर नागरिकांनी एकञित फिरू नये म्हणुन शहरात जागोजाग पोलिसांचा बंदोबस्त लावलाचा पुरेपुर फायदा वाळू माफीयानी घेत गोदावरी पाञातील रेल्वे पुल परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू दररोज पाहाटे तीन पासून सुरू करण्यात आलेला आहे.रेल्वे पुल परिसात असंख्य ट्राक्टर राञीचा फायदा घेत गोदापाञातील रेल्वे पुल परिसरातुन वाळू करून साठा करण्याचा गोरखधंदा वाळू माफीयानी सुरू केला आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग होउ नये यासाठी शासनाने बांधकामावर पूर्णपणे बंदी घातलेली आसताना गोदापाञातून वाळू माफीयानी वाळू उपसा सुरू करून साठा करण्याचे काम सुरू केले आहे.रेल्वे पुलास आज १२७ वर्ष पूर्ण झाले आसून याचे बांधकाम ईग्रंजाचा कालखंडात झाले आसून आज पर्यत रेल्वे पुल परीसरात मोठ्या प्रमाणात वाळू आसल्याने पुलाचा पाया भक्कम मजबूत होता.सदरील या रेल्वे पुलाची निर्मिती करणारी ईग्रंजाची कंपनी पुला बाबत पञ व्यवहार रेल्वे प्रशासनासी करत आसते.तर रेल्वे प्रशासनाने अनेक वेळा महसुल प्रशासनासी पञ पाठवून रेल्वे पुला जवळ होणाऱ्या वाळू प्रकरणी वाळू माफीयावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली आसताना याकडे महसुल प्रशासनाने गांर्भीय पुर्वक लक्षच दिले नाही.वाळूने भरलेले गोदावरी पाञ वाळू माफीयानी खरडून नेले आता वाळू माफीयानी आपला मोर्चा रेल्वे पुल परीसरा कडे वळवित चक्क पुल परिसरात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा केल्याने रेल्वे पुलाचे सर्वच पिल्लराचा पाया चार सहा फुटा पर्यत उघडा पडल्याने पुलास धोका निर्माण झाला आहे.याबाबत रेल्वे प्रशासन सह महसुल पोलिस प्रशासनाने त्वरीत लक्ष देण्याची मागणी नागरिकांत होत आहे.