THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Wednesday, May 6, 2020

TCS

पालम तालुका पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने पत्रकारांसाठी विमा संरक्षणाची मागणी

राजकुमार मुंडे 
गंगाखेड़ महाराष्ट्र,06 May 2020
कोरोणाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यातील पत्रकार बांधवांसाठी 25 लाखाचे विमा संरक्षण देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पालम तालुका पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आले.
 जगाच्या पाठीवर कोरोणा या महामारी ने धुमाकूळ घातला असून अशा परिस्थितीत प्रसार माध्यमांची महत्त्वाची भूमिका आहे. परभणी जिल्ह्यातून इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रिंट मीडिया चे पत्रकार गल्लोगल्ली फिरून वार्तांकन करत आहेत. जनतेच्या भल्यासाठी व राष्ट्राच्या हितासाठी आपले संसार व कुटुंब बाजूला ठेवून पत्रकारांची भूमिका जनजागरणाचा साठी अत्यंत प्रभावी ठरली आहे.
www.thecurrentscenario.com
मात्र त्यांना कुठलाही आर्थिक आधार  नसल्यामुळे वर्तमान परिस्थितीत राज्य सरकार व केंद्र शासन ने जिल्ह्यातीलच नव्हे तर पूर्ण देशातील पत्रकार बांधवांसाठी पंचवीस लाख रुपयांचा कौटुंबिक विमा संरक्षण देण्यात यावे अशी मागणी सुरक्षा समितीच्या वतीने करण्यात आली आहे
www.thecurrentscenario.com
. इलेक्ट्रॉनिक मीडिया व प्रींट मीडियाशी संबंधित सर्वांनाच राज्य सरकार व केंद्र सरकारने विमा संरक्षण द्यावे असे निवेदनात पुढे म्हटले आहे .निवेदनावर पत्रकार सुरक्षा समितीचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पोळ, तालुकाध्यक्ष रूकमाजी गिनेगिने, पालम तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण गायकवाड ,पालम तालुका सल्लागार मार्गदर्शक माधव हनवते, पालम तालुका सचिव शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष अनिस कुरेशी, गोविंद सोलेवाड, शेख गौस शहाबुद्दिन , बाळासाहेब चाळक ,सचिन शिंदे, दत्ता बंडेवाढ, शादुल आतार, अंकुश वाघमारे आदींच्या सह्या आहेत.