THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, May 8, 2020

TCS

१९१ अहवाल प्राप्तः ४२ पॉझिटीव्ह, १४९ निगेटीव्ह

TCS News Network
Akola,08 May 2020
आज दिवसभरात (सायंकाळी सात वाजेपर्यंत)कोरोना संसर्ग तपासणीचे १९१ अहवाल प्राप्त झाले. त्यातील १४९ अहवाल निगेटीव्ह तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे आता  पॉझिटीव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या १३७ झाली  आहे. दरम्यान आज एका ७८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आजअखेर प्रत्यक्षात १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत,अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजअखेर एकूण १२८१ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १२६८ अहवाल आले आहेत. आजअखेर एकूण ११३१ अहवाल निगेटीव्ह तर १३७ अहवाल पॉझिटीव्ह प्राप्त झाले आहेत व  १३ अहवाल प्रलंबित आहेत.
आजपर्यंत एकूण १२८१ जणांचे नमुने पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०८४, फेरतपासणीचे ९६ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ नमुने होते. आजपर्यंत एकूण १२६८ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे १०७१ तर फेरतपासणीचे ९६ व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे १०१ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ११३१ आहे. तर पॉझिटीव्ह अहवाल १३७ आहेत. तर आजअखेर १३ नमुन्यांचे अहवाल प्रलंबित आहेत.
आज प्राप्त झालेल्या १९१ अहवालात १४९ अहवाल निगेटीव्ह आले आहेत तर ४२ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.
www.thecurrentscenario.com
एका वृद्धेचा उपचारा दरम्यान मृत्यू
आज एका ७८ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही महिला  दि. १ रोजी दाखल झाली होती. दि. ५ रोजी तिचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान उपचार सुरु असतांना आज दुपारी तिचा मृत्यू झाला.
१११ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु
आता सद्यस्थितीत  १३७ जणांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आहेत. त्यातील बारा जण मयत आहेत.  तर गुरुवारी (दि.२३एप्रिल) सात जण व सोमवारी (दि.२७ एप्रिल) एका जणास, गुरुवारी (दि.३० एप्रिल) तिघांना आणि रविवार दि.३ मे रोजी दोघांना तर बुधवार दि.६ मे  रोजी एकास  असे १४ जणांना घरी सोडण्यात आले आहे. तर सद्यस्थितीत १११ पॉझिटीव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आज पॉझिटीव्ह आढळलेले रुग्णांपैकी २० जण बैदपूरा येथील आहेत तर मोह. अलि रोड, राधाकिसन प्लॉट, खैर मोहम्मद प्लॉट येथील तिघे, सराफा बाजार, अकोट फैल व जुने शहर येथील प्रत्येकी दोघे तर जुना तारफैल, गुलजार पुरा, आळशी प्लॉट, मोमिन पुरा, भगतसिंग चौक माळीपुरा, राठी मार्केट, काला चबुतरा येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान आजअखेर १२२० प्रवासी आले आहेत. त्यापैकी ५८६ गृहअलगीकरणात व ९६ संस्थागत अलगीकरणात असे ६८२ जण अलगीकरणात आहेत. तर ४२१ जणांचा अलगीकरणाचा १४ दिवसांचा कालावधी  पूर्ण झाला आहे.  तर ११६ रुग्ण हे विलगीकरण कक्षात आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.