THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Saturday, May 16, 2020

TCS

गंगाखेड तालुक्यातील १३३ मजुर उत्तर प्रदेशात रवाना 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,16 May 2020
गंगाखेड,पालम व सोनपेठ तालुक्यात अडकलेले १३३ मजुर आज शनिवार रोजी उत्तर प्रदेशातील आपल्या मुळ गावी बसने रवाना औरंगाबाद पर्यत रवाना करण्यात आले.तेथून रेल्वे आपल्या गावी पाठविण्याची सोय करण्यात आली आहे.
www.thecurrentscenario.com
लाँडाउन मुळे सर्व राज्याचा सीमा बंद करण्यात आल्याने परजिल्हातील व परराज्यातील कामगार मजुर गंगाखेड,पालम व सोनपेठ तालुक्यात अडकुन पडले होते,लाँकडाऊनचा पहिला-दुसरा व तिसरा टप्पा चालुच असल्याने अडकलेले मजुर आपली खाण्या पिण्याची व्यवस्था जिंनिग मालक करत आसतानाही त्यांना आपल्या मुळ गावी जाण्याची ओढ होती.वाहाने बंद असल्याने पायी चालत गावाकडे निघुन जात होते,परंतु या मजुरांना पोलीस जागो-जागी अडवुन परत पाठविण्यात येत होते.औरंगाबाद जिल्हातील करमाड येथील घटनेने केंद्र व राज्य सरकार ने घटनेचे दु:ख व्यक्त करुन काही दिवसातच परजिल्हा तसेच राज्यातील अडकलेल्या मजुरांना रेल्वे तसेच महामंडळाच्या बसने सोडण्याणी व्यवस्था सरकारने केल्याने गंगाखेड,पालम व सोनपेठ तालुक्यात अडकलेले मजुर कामगार यांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार दि.११ मे ,१३ व आज दि.१६ मे रोजी असे तीन दिवस १३३ कामगाराची महामंडळाच्या बसने सोशल डिस्टींग राखुन एका-एका बसमध्ये अंतर राखुन १५ कामगार मजुर बसमध्ये आपल्या मुळ गावी मध्यप्रदेश,उत्तर प्रदेश,औरंगाबाद,हैद्राबाद अदिसह इतर ठिकाणचे अडकलेले मजुर कामगार मुळगावी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली. यामध्ये गंगाखेड तालुक्यातील मजुर कामगार ११५ ,पालम तालुक्यातील १० व सोनपेठ तालुक्यातील ८ असे ११५ मजुर परिवहन महामंडळाच्या बसने रवाना करण्यात आले.यावेळी अडकलेल्या मजुरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.या सर्व मजुराची गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात व बसस्थानकात आरोग्य तपासणी उप जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाँ.योगेश मल्लुरवार यांनी मजुराची आरोग्य तपासणी करुनच पाठविण्यात आले.यावेळी तहसिलदार स्वरुप कंकाळ,उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी बलराज लांजीले,पो.निरीक्षक वाय.एन.शेख तलाठी,मंडळाधिकारी,डाँक्टर्से,आगार प्रमुख कराळे के.व्ही. ,बसस्थानक प्रमुख व आगारातील चालक वहाक अदिसह माजी सैनिक उपस्थित होते.