THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, May 8, 2020

TCS

१० वी, १२ वी उत्तर पत्रिका तपासणी कामासाठी नियुक्त शिक्षक, शिक्षकेतरांना संचारबंदीतून सवलत

TCS News Network
Akola,08 May 2020
इयत्ता १० वी व १२ वी च्या परीक्षांचे निकाल वेळेत घोषित करता यावेत या साठी उत्तर पत्रिका तपासणे, निकालाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नियुक्त केलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नेमून दिलेल्या कामांसाठी संचारबंदीतून सवलत देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.यासंदर्भात निर्गमित आदेशात म्हटले आहे की, इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेच्या उत्तर पत्रिकांची तपासणी करुन वेळेत निकाल प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याने नियुक्त शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना संचारबंदीतून सवलत देण्यात येत आहे.  कोविड-१९ विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागु करण्यात आलेल्या संचारबंदीमधुन संबंधीत अधिकारी/ शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी व अन्य संबंधीत कर्मचारी यांना उत्तरपत्रिका परिक्षा केंद्रावरुन किंवा पोष्टातून संबंधीत शाळा/ महाविद्यालयास पोहचविणे, उत्तरपत्रिका शाळेतून परिक्षकाच्या घरी घेऊन जाणे, परिक्षकाकडून नियामक (मॉडरेटर्स) कडे उत्तरपत्रिका पोहचविणे, नियामकांकडील उत्तरपत्रिका विभागीय मंडळाकडे जमा करणे इत्यादी कामाकरीता तसेच इतर संबंधीत कामाकरीता अटी व शर्तीवर त्यांचे प्रवासाकरीता परवानगी देण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे. 
अटी व शर्ती-
१)संबंधित कर्मचाऱ्यांनी संबंधित कामाकरीता मंडळाने दिलेले आदेश व स्वतःचे ओळखपत्र जवळ बाळगणे बंधनकारक राहिल.
२) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ  पुणे यांच्या अधिनस्त विभाग्फ़ीय मंडळातील  अधिकारी, कर्मचारी व शिक्षक यांना प्रवास करता येईल.
३) ही सुट खाजगी/ सार्वजनिक वाहनास अथवा मंडळाच्या ठेकेदाराकडील भाडेतत्त्वावर घेतलेल्या वाहनांना राहिल.