THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Tuesday, May 19, 2020

TCS

अत्यावश्यक सेवा नावावर फिरणा-याची सखोल चौकशी करून कार्यवाही करा--गोंविद यादव 

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,19 May 2020
कोरोना विषाणू शहराचा उबंरठावर पोहचला आसताना हि बाजार पेठेत मोकाट फिरणा-यांची संख्या काही केल्याने थांबत नाही.लाँकडाउन संचारबंदीची कार्यवाही होऊ नये म्हणुन दुचाकीवर अत्यावश्यक सेवेचा कागद लावून तर गळ्यात ओळपञ घालून भामटेगिरी करणाऱ्याची सखोल चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष गोंविद यादव यांनी केली आहे.
परभणी जिल्हात कोरोनाने शिरकाव करू नये यासाठी जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक जिल्हा आरोग्यधिकारी यांनी अहोराञ प्रयत्न केले.जिल्हा सीमा बंद केल्या पण अखेर बाहेरून येणाऱ्यानी जिल्हात कोरोना विषाणू आणलाच यामुळे प्रशासन हायअर्लट झाले बंदोबस्त अधिकच कडक करण्यात आला.तरी सुद्धा नागरिकांना कोरोनाचे अद्यापही गांर्भीय कळालेच नाही.शहराचा उबंरठ्यावर आसलेल्या शेळगावात कोरोनाचा रुग्ण सापडला आणी शहरात चर्चा सुरू झाली.पण शहरात मोकाट फिरणा-याची संख्या वाढतच गेली.सदरील मोकाट फिरणा-याचा असंख्य दुचाकीवर अत्यावश्यक सेवाचे झेराक्स कागद लावून खुलेआम सकाळ पासून राञी बारा पर्यत गल्ली बोळापासून बाजारपेठेत फिरणा-या अतिउत्साही यांची पोलीस निरीक्षक यांनी सखोल चौकशी करणे गरजेचे आहे.सदरील व्यक्ती कोणती अत्यावश्यक सेवा देत आहे.तर मोकाट फिरणा-यांनी गळ्यात आडकविले ओळखपञ यांचीही चौकशी करून बनावट ओळखपञ व बोगस अत्यावश्यक सेवेचा नावाखाली फिरणा-यावर कार्यवाही केल्या शिवाय रस्तावरील वाढती गर्दी कमी होणार नाही.सायंकाळी पाच नंतर भगवती चौक ते बालाजी मंदीर रस्तावरील ओट्यावर बसणारानी तर कोरोनास आव्हानच दिल्याचे दिसते आहे.तर पोलिस स्टेशन ते भगवती चौक रस्तावर राञी आकरा पर्यत नागरिकांसह अत्यावश्यक सेवा गळ्यात ओळपञ घालून फिरणा-या नागरिकावर कार्यवाही करण्याची मागणी काँग्रेस तालुका अध्यक्ष गोंविद यादव यांनी केली आहे..