THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, May 17, 2020

TCS

 गंगाखेड तालुक्यात एक लाख १०  हजाराची दारू व रसायन पकडले !

ब्यूरो चीफ राजकुमार मुंडे
परभणी,17 May 2020
गंगाखेड तालुक्यामध्ये खादगाव पाठीवर, मालेवाडी शिवारामध्ये भट्टी दारू काढत असल्याची माहिती परभणी गुन्हे अन्वेषण शाखेला गुप्त माहिती मिळाल्यावरुन  गंगाखेड पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाला दारु काढत असल्याची माहिती लागली होती यावरून त्यांनी मालेवाडी शिवारात खादगाव पाठीवर व शहरातील लहुजी नगर येथे धाडी टाकून 16 मे रोजी रात्री १० वा. १ लाख १० हजार रुपयात हातभट्टी दारू सहित दारू काढण्याचे रसायन व आरोपीला पकडले.  आरोपीविरुद्ध गंगाखेड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
www.thecurrentscenario.com
 याबाबत सविस्तर माहिती गंगाखेड पोलिस ठाणे अंतर्गत मालेवाडी शिवरामध्ये हातभट्टी दारु काढत असल्याची माहिती परभणी गुन्हे शाखेला मिळताच परभणी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश वैजनाथ डोंगरी व त्यांचे पथक दिनांक १६ मे रोजी मालेवाडी शिवारात रात्री १० वाजता दाखल झाले याठिकाणी नदीपात्रामध्ये 300 लिटरच्या पाण्याच्या टाक्या मध्ये तुरटी व दारू काढण्याचे रसायन 900 लिटर मिळून आले त्याची किंमत 90 हजार रुपये असून याठिकाणी आरोपीला सुद्धा ताब्यात घेण्यात आले.  गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये परभणी गुन्हे अन्वेषण शाखेचे सुरेश वैजनाथ डोंगरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी सचिन त्र्यंबक जाधव या आरोपींविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये गुरन 244 कलम 65 दारू प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास जमादार सुरेश पाटील हे करीत आहेत.

तसेच याच दिवशी  गंगाखेड पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या आदेशावरून उपविभागीय अधिकारी यांच्या पथकाने रात्री ७ वाजता लहुजी नगर येथे गुप्त माहिती दारा द्वारे मिळालेल्या माहितीवरून धाड टाकून आरोपी रुस्तुम रामा गायकवाड यांच्या घरातील ४५०  रुपयाची गावठी दारू जप्त करून गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल शंकर माधव गव्हाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध 243 कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास जमदार भारती करीत आहेत.

व  गंगाखेड ते कोद्री रोडवर दिनांक 16 मे रोजी दुपारी २ वाजता पोलीस उपविभागीय अधिकारी यांच्या अंतर्गत या पथकाने गुप्त माहिती दारा द्वारे मिळालेल्या माहितीवरून छापा टाकून मोटरसायकल क्रमांक mh 22 ac 5957 या मोटरसायकलला ताब्यात घेऊन त्यावर 18 हजार रुपयांची गावठी दारू पकडली याप्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आनंत माधवराव डोंगरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी माधव शेषराव साळवे व अनोळखी एक इसम राहणार पांगरी यांच्याविरुद्ध उरण 241 कलम 65 ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास जमादार सावंत हे करीत आहेत या प्रकरणातील आरोपी मात्र मोटारसायकल सोडून पळुन गेलेत ते तक्रारीत नमूद केले आहे एकाच दिवशी हातभट्टी दारू वर पोलिस उपविभागीय अधिकारी गंगाखेड स्थानिक गुन्हे शाखा परभणी यांच्या पथकाने तरी टाकून १ लाख १० हजाराची दारू व रसायन दारू करण्याचे सामान व आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केल्याची केल्याने एकच खळबळ माजली आहे.एकाच दिवशी वरिष्ठ अधिकार्‍याकडून गंगाखेड पोलीस स्टेशन अंतर्गत गाडी पडल्याने गंगाखेड पोलीस स्टेशनच्या अधिकारी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.