THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Sunday, May 10, 2020

TCS

गोदावरी पाञात वाळू उपसा करणारे ट्राँक्टर सह दोघाना अटक आठ जण फरार....

राजकुमार मुंडे 
गंगाखेड महाराष्ट्र,10 May 2020
शहरा पासून जवळच आसलेल्या खरबडा येथील गोदापाञात बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या दोन ट्राँक्टर सह दोघाना गंगाखेड पोलिसानी आज रविवार रोजी सकाळी पाचचा दरम्यान अटक केली आसता इतर आठ जण फरार झाले आसून यांचा शोध पोलिस प्रशासन घेत आहे.
www.thecurrentscenario.com
कोरोनाचा लाँकडाउन संधीचा फायदा घेत वाळू माफीयानी गोदावरी पाञात वाळू उपसा करण्याचा सपाटा लावलेला आसून आज दि.१० रोजी खरबडा येथील गोदावरी पाञात बेकायदा वाळू उपसा करून ट्राँक्टर मध्ये भरीत आसल्याची माहिती सकाळी चार वाजता पोलिस निरीक्षक वाय.एन.शेख यांना मिळाली आसता पोलिस शिपाई पठाण,सुर्यवंशी,शे.उमर सह खाजगी वहानाने खरबडा येथील गोदावरी पाञात गेले आसता सहा ट्रँक्टर मध्ये मजूर लावून वाळू उपसा करीत आसल्याचे दिसून आले.पोलिस येताच अनेकानी पळ काढला पण दोन ट्राँक्टर पकडण्यात यश आले.यामध्ये विना नंबर महिद्रांचे ट्रँक्टर चालक मालक देविदास पिराजी माळगे व कुबोटा ट्रँक्टर एम.एच.२२ एएम ०८८९ मालक चालक लिंबाजी उर्फ दिपक रामकिशन माळगे यांना अटक करण्यात येवून भादवी १४४ ३७९ १८८ २६९ २७० महाराष्ट्र जमीन महसुल अधिनयम ४८(७) (८) नूसार गुन्हा दाखल करण्यात येवून फरार आठ जणाचा कसून शोध सुरू आहे.