THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Wednesday, April 22, 2020

Ramzan

रमजान महिन्यात ही सामाजिक विलगिकरण पालन करण्याचे आवाहन

अकोला,दि.२२ कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी आगामी रमजान महीन्यात मुस्लिम बांधवांनी केंद्र सरकारच्या अल्पसंख्याक मंत्रालयाने।दिलेल्या निर्देशानुसार सामाजिक विलगिकरण पाळावे असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनेचा एक भाग म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा- 2005, साथरोग अधिनियम 1897 व महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 14 मार्च 2020 चे अधिसूचनेनुसार तसेच फौजदारी प्रक्रिया संहिता-1973 चे कलम 144 नुसार दिनांक 03.05.2020 चे मध्यरात्रीपर्यंत संचारबंदी लावण्यात आली आहे.
नजिकच्या काळात मुस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरु होत आहे. रमजान महिन्यामध्ये मुस्लीम समाजामध्ये मोठया संख्येने मस्जीदीमध्ये जावून तसेच सार्वजनिकरित्या नमाज अदा करण्याची प्रथा आहे. सद्यस्थिती लक्षात घेता, अधिक संख्येने लोक एकत्र आल्यास कोरोना विषाणूचा संसर्ग /संक्रमण मोठया प्रमाणावरहोण्याची शक्यता असते. हे संक्रमण टाळण्यासाठी सार्वजनिकरित्या नमाज अदा न करणे मुस्लीम बांधवांच्या आरोग्याच्या व जीवनाच्या हिताचे
असल्याने सार्वजनिकरित्या अथवा मस्जीदीमध्ये सर्व समाजबांधवांनी एकत्र येवुन नमाज अदा न करणे हितवाह ठरणार आहे. तरी आगामी रमजान महिन्यामध्ये शासनाने ठरवून दिलेल्या लाकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तारीच्या अनुषंगाने एकत्र न येण्याबाबत अल्पसंख्याक कार्य मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्याकडून निर्देशही प्राप्त झाले आहेत. त्या निर्देशानुसार सर्व मुस्लीम बांधवांना खालील सूचना देण्यात येत आहेत.

1. सामाजिक विलगीकरणाचे पालन पवित्र रमजान महिन्यामध्ये देखील कटाक्षाने करावे.
2. कोणत्याही परिस्थितीत मशीदीमध्ये नियमित नमाज पठण, तरावीह तसेच इप्तारसाठी एकत्र येऊ नये.
3. घराच्या / इमारतीच्या छतावर एकत्र येऊन नियमित नमाज पठण अथवा इप्तार करण्यात येऊ नये.
4. मोकळया मैदानावर एकत्र जमून नियमित नमाज पठण इप्तार करण्यात येऊ नये,
5. कोणत्याही सामाजिक, धार्मीक किंवा कौंटुंबीक कार्यक्रम एकत्रित येऊन करण्यास मज्जाव करण्यात
आलेला आहे याची नोंद घ्यावी.
6. सर्व मुस्लीम बांधवानी त्यांच्या घरात नियमित नमाज पठण, तरावीह व इफ्तार इत्यादी धार्मीक कार्य पार पाडावे.
7. लॉकडाऊन विषयी पुढील आदेश प्राप्त होईपर्यत उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.