THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Thursday, April 23, 2020

Patur

अभ्युदय फाऊंडेशनच्या वतीने सॅनिटीझर चे वाटप

फ़राहान अमीन
पातुर,23 April 2020

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा देणार्‍याना पातुरच्या अभ्युदय फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेने सॅनिटीझर चे वाटप केले.

अख्ख्या जगाला कोरोना ने ग्रासले आहे. अशा परिस्थितीत आपला जीव धोक्यात घालून डॉक्टर्स, नर्स, पोलीस, प्रशासन, पत्रकार, वृत्तपत्र विक्रेता काम करीत आहेत.
    
सोबतच अशा परिस्थितीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करणारे किराणा व्यापारी आपली सेवा देत आहेत. या सर्वाना अभ्युदय फाऊंडेशन तर्फे अध्यक्ष गोपाल गाडगे, सचिव बंटी गहीलोत, प्रविण निलखन, डॉ. संजय सिंह परिहार, प्रशांत बंड, दिलीप भाऊ निमकडे, शुभम पोहरे आदी पदाधिकारी यांना सॅनिटीझर चे वाटप केले. सोशल डिस्टन्सइंग चे पालन करून सॅनिटीझर चे वाटप करण्यात आले. पातुर चे ठाणेदार गुल्हाने साहेब,
तहसीलदार संदीप बाजड यांना वाटप करण्यात आले यानंतर किराणा व्यापारी असोसिएशन चे अब्दुल कुदुस, शंकर देशमुख, सुरेश देशमुख यांच्यासह डॉ. नंदू गावडे उपस्थित होते. यानंतर परिसरातील पेट्रोल पंप कर्मचारी यांना वाटप करण्यात आले.
लोकशाही चा चौथा आधारस्तंभ असलेल्या पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांना सानेटायझर चे वाटप करण्यात आले. यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ दिगांबर खुरसडे, उमेश देशमुख, मोहन जोशी, प्रा सी. पी. शेकूवाले,मोहम्मद फरहान अमीन, देवानंद गहिले, प्रदीप काळपांडे, संगीता इंगळे, राजाराम देवकर, सतीश सरोदे, संतोषकुमार गवई, जयवंत पुरुषोत्तम, सचिन मूर्तडकर, नातीक शेख, अन्वर खान, कपिल पोहरे, श्रीकृष्ण शेगोकार, स्वप्निल सुरवाडे, प्रशांत गवई, विशाल बीडवाले आदींसह पत्रकार बांधव व वृत्तपत्र विक्रेता उपस्थित होते. सोशल डिस्टन्सईंग पाळून हा उपक्रम पार पडला.