THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Monday, April 20, 2020

COVID Update

आजच्या २१ पैकी सर्व अहवाल निगेटीव्ह, आजपर्यंत ४१४ अहवालांपैकी ३९८ निगेटीव्ह

अकोला,दि.२०-एप्रेल-२०२० 
जिल्ह्यात आज एकाही रुग्ण संख्येत वाढ झाली नाही. आज प्राप्त २१ अहवालांपैकी सर्वच्या सर्व निगेटीव्ह आले आहेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी स्पष्ट केले आहे. आजअखेर एकूण ४१४ अहवाल प्राप्त झाले होते त्यापैकी ३९८ निगेटीव्ह आले आहेत.यासंदर्भात प्राप्त माहितीनुसार,आजपर्यंत एकूण ४१९ जणांचे नमुने
पाठवण्यात आले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३३५, फेरतपासणीचे ६० तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४ नमुने होते. आज २१ अहवाल प्राप्त झाले. त्यात २१ निगेटीव्ह आले आहे. आजपर्यंत एकूण ४१४ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात प्राथमिक तपासणीचे ३३० तर फेरतपासणीचे ६० व वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे २४ अहवाल आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या ३९८ आहे.

आजअखेर जिल्ह्यात पाच अहवाल प्रलंबित  असून ते सर्व प्राथमिक अहवाल आहेत. सद्यस्थितीत ४८ रुग्ण भरती आहेत. जिल्ह्यात आज अखेर ४८४ जण बाहेरुन आलेल्यांची संख्या आहे.  त्यापैकी १७५ जण गृह अलगीकरणात तर ११२ जण संस्थागत अलगीकरणात असे एकूण २८७ जण अलगीकरणात आहेत. १५५ जणांची अलगीकरणाची १४ दिवसांची मुदत पूर्ण झाली आहे तर विलगीकरणात आता ४१ जण दाखल आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली आहे.