THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Friday, April 17, 2020

Akola

आकोल्यात "नमो थाली" चे वितरण

TCS NEWS NETWORK
17 Apr2020 अकोला
कोविंड 19 विषाणू महामारी च्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन-२  मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी अकोला महानगर तर्फे केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे यांच्या नेतृत्वात जिल्हा भाजपा अध्यक्ष रणधीर सावरकर, महानगराध्यक्ष विजय अग्रवाल यांच्या नेतृत्वात आज पासून "नमो थाली" वितरण शहरातील 142 वस्त्यांमध्ये 16 हजार 732 नमो थालीवितरण करून सर्वसामान्य विद्यार्थी, मजूर,आदिवासी, दलित यांना न्याय देण्याचे काम पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा अंतोदय समाजाच्या शेवटच्या दरिद्री नारायणाची सेवा व संत गजानन महाराजांना अभिप्रेत अन्नदान कार्यक्रम शहरांमध्ये राबविण्यात आला.
www.thecurrentscenario.com
या मध्ये भाजपा सरचिटणीस डॉक्टर विनोद बोर्डे,संजय जिरापुरे, वसंत बाछुका, विनोद मनवानी, हरिभाऊ काळे, संजय गोडा,अक्षय गंगाखेडकर, निलेश निनोरे,तुषार भिरड, संतोष पांडे, अनिल मुरूमकर,मनोज साहू,अमोल अग्रवाल, देवाशिष काकड, संजय गोटेफोडे, अमोल गोगे. गणेश  अंधारे, राजेंद्र गिरी, उमेश गुजर,रमेश चांडक, अनिल चांडक,राहुल देशमुख, महापौर अर्चना मसने, जयंत मसने आदींनी कार सेवा देऊन शहराच्या विविध भागांमध्ये नमो थाली च्या माध्यमाने सेवा करून  पंतप्रधान नरेंद्र मोदी,राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या सूचनांचे  तंतोतंत पालन करून केंद्रीय राज्यमंत्री संजय भाऊ धोत्रे व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी,महानगरपालिकेतील नगरसेवक, मंडळाचे पदाधिकारी, महानगराची पदाधिकारी यांनी शासनाच्या या आदेशाचे पालन करून मार्क्स व विविध आरोग्य विभागाच्या दक्षता संयम पालन करून घरोघरी नमो थाली वितरण केले. स्थानिक माहेश्वरी भवन येथे आजपासून नमो थालीच्या माध्यमातून सेवा प्रकल्प सुरू झाला आहे. महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल व आमदार रणधीर सावरकर यासंबंधी लक्ष केंद्रित ठेवून सर्वांना आधार देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करीत आहे.