THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Tuesday, April 21, 2020

AKola

अकोल्यात दाना बाजारात भीषण आग; १५ ते २० दुकाने जळून खाक

अकोला, २१ एप्रेल २०२०
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या दाना बाजारात मोठ्या संख्येने किराणा दुकाने आहेत. मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास अचानक किराना दुकानांना आग लागली. पाहता पाहता आगीने एक-एक किराणा दुकानाला कवेत घेतले. आग लागल्याचे वृत्त समजताच महानगपालिकेचे कर्मचारी व अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग
विझविण्यास प्रारंभ केला. दोन तास शर्थीचे प्रयत्न केल्यानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. तोपर्यंत १५ ते २० दुकाने मात्र जळून खाक झाली. या आगीत किराणा दुकानातील माल भस्मसात झाला असून, व्यापारयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

आग लागल्याचे समजताच आमदार गोवर्धन शर्मा, आमदार गोपीकिशन बाजोरीया, महापौर अर्चना मसने, माजी महापौर विजय अग्रवाल यांच्यासह लोकप्रतिनिधींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी करीत व्यापार्यांशी चर्चा केली. सद्या लॉकडाऊनमुळे या भागात मोठा पोलिस बंदोबस्त असताना आग कशी लागली, याचा शोध घ्यावा अशी मागणी आमदार गोवर्धन शर्मा यांनी केली आहे.