THE CURRENT SCENARIO

Advertisement

BREAKING

BSE-SENSEX:: 59,015.89 −125.27 (0.21%) :: :: NSE :: Nifty:: 17,585.15 −44.35 (0.25%)_ ::US$_:: 73.55 Indian Rupee_.

Monday, April 20, 2020

Akola

आँरेज व ग्रीन झोनमध्ये वृत्तपत्र वितरणला परवानगी द्या गृहमंत्री ना. देशमुख यांच्याकडे जिल्हा पत्रकार संघाची मागणी

अकोला -  प्रतिनिधी, २० एप्रिल
कोरोना पाश्र्वभुमिवर जाहीर करण्यात आलेल्या राज्यातील आँरेज व ग्रीन झोनमध्ये वृत्तपत्रांचे घरपोच वितरण करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी अकोला जिल्हा पत्रकार  संघाच्या एका शिष्टमंडळाने आज राज्याचे गृहमंत्री ना. अनील देशमुख यांच्याकडे एक निवेदन देवून केली. याप्रसंगी केद्रिय मानव संसाधन मंत्री ना. संजय धोत्रे हे उपस्थित होते.राज्याचे गृहमंत्री ना. अनील देशमुख आज अकोला जिल्हा दौरयावर होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथील बैठक आटोपल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा, अकोला जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष शौकतअली मिरसाहेब, सरचिटणीस प्रमोद लाजुरकर, संजय खांडेकर, मनीष खर्चे, कमल शर्मा यांनी ना. देशमुख यांना मागणीचे निवेदन 
सादर केले. वृत्तपत्र छापण्यास परवानगी आहे मात्र वृत्तपत्राचे घरपोच वितरण  करता येणार नाही असा शासनाचा आदेश आहे. हा आदेश मागे घेण्यात यावा आणि  राज्यातील  ग्रीन व आँरेज झोन मध्ये वृत्तपत्र वितरण करण्याला परवानगी देण्यात यावी तसेच ३१ मार्च पुवीa मंजूर झालेले जिल्हा दैनिकांचे शासकिय जाहीरातीचे देयके  अदा करण्यात यावी अशा दोन मागण्या यावेळी ना. देशमख यांच्याकडे करण्यात आल्या. केद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे  वृत्तपत्र वितरणावर बंदी घालण्यात आली आहे. ग्रीन व आँरेज झोन मधील हॉटस्पॉट वगळून वृत्तपत्र वितरण करता येवू शकेल का या मुद्यावर  मुख्यमंत्री व मंत्री मंडळातील इतर सहकारी यांच्याशी चर्चा करून तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी ना. देशमुख यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला दिले.